चीन आणि मालदीवच्या संबंधांमुळे भारताच्या अडचणी वाढतील का?
भारताच्या दक्षिणेला असलेल्या छोट्याशा मालदीवच्या एकूण विकासामध्ये भारताने कायमच महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मालदीव मध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या आणि मोहम्मद मुइझू हे त्यांचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेत ,आता ते राष्ट्रध्यक्ष म्हणून निवडून आले तेच त्यांच्या भारत विरोधी भूमिकेमुळे आणि त्यांचं धोरणच होतं इंडिया आणि त्याला माली मालदीव मधल्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट सुद्धा केला होता.
या पूर्वीचे त्यांचे भारतात सोबतचे चांगले संबंध होते भारतासोबतचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते आणि त्यांनाही माहिती होतं की ज्या ज्या वेळेस मालदीवला गरज पडेल त्यावेळेस भारतच त्यांच्या मदतीसाठी उभा राहील ज्यावेळेस मालदीव वरती सुनामीच संकट आलं होतं त्यावेळेस भारतच त्यांच्या मदतीसाठी धावून गेला, मध्ये भारताने त्यांना सर्व वैद्यकीय मदत सुद्धा पुरवलेली होती, पण आता गोष्टी बदललेल्या दिसतात. मालदीव मधल्या सरकारमध्ये भारताविषयी काही कारण नसताना आकर्श दिसून येते आणि त्याच्या मागे चीन विषयी त्यांचे जे वाढलेलं प्रेम आहे ते सुद्धा असू शकत.
नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षदीपचा दौरा केला आणि लक्षद्वीप मधील फोटो शेअर केले आणि त्याच्यानंतर मालदीव मधल्या नेत्यांनी या फोटोवरून आक्शेपार्ह टिप्पणी केली, ज्याच्यामुळे मालदीव आणि भारताचे संबंध कधी न मिळतेच दुरावलेले आहेत. आता ज्यांनीही टिप्पणी केली होती त्या तीनही नेत्यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने निलम्बीत केलेला आहे आणि वाद कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीसुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश पहायला मिळतोय.
भारतामध्ये ban maldives हा ट्रेंड व्हायरल होताना दिसतोय. मालदीवने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यामागे चीन असल्याचं सांगितलं आहे. नवीन जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या दौऱ्यासाठी चीन चीच निवड केलेली आहे आणि याच्यातून त्यांचं चीन विषयीचं प्रेम स्पष्टपणे दिसून येते आज आपण माहिती घेणार आहोत भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधाची आणि चीन या संबंधांमध्ये कसा खडा टाकतोय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
भारताने कायमच मालदीवच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मालदीवच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय पर्यटकांचा वाटा मोठा आहे. मालदीव मध्ये विमानतळ डेव्हलप करण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात मदत केली होती. क्रिकेट स्टेडियमची उभारणी करण्यासाठी मदत केली, त्यांच्या येथे सगळ्यात मोठे कॅन्सर हॉस्पिटल आहे ते म्हंजे ‘इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल’ ते सुद्धा निर्माण करण्यामध्ये भारतानेच मदत केलेली आहे. आता मालदीव मध्ये वेगवेगळे हजारो बेट आहेत आणि हे बेट कनेक्ट करण्यासाठी सुद्धा भारताने त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे आणि नेहमीच मदतीचा हात सुद्धा दिलेला आहे पण सध्या नवीन सरकार आल्यानंतर मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संबंध दुरावलेले आहेत.
बँन मालदीव हा हॅशटॅग त्याच्यामुळेच व्हायरल होताना दिसतोय आणि आपल्या इथल्या खूप साऱ्या पर्यटकांनी मालदीवला जाणं रद्द सुद्धा केलेला आहे. याआधी मालदीव मधल्या हॉटेलमध्ये बुकिंग ज्या आहे ते रद्द केलेल्या आहेत. आक्षेपार्ह टिप्पणी केलेल्या नेत्यांना निलंबित केले त्याच्यामुळे मालदीव अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि भारताचा त्यांच्या पर्यटनामध्ये मोठा वाटा आहे.
मालदीवला सुनामी सारख्या संकटामध्ये भारताने मदत केलेली आहे, त्यावेळेस चीन त्यांच्या मदतीला धावून गेला नव्हता तर भारत त्यांच्या मदतीसाठी धावून गेला होता. मालदीवला भारताची गरज का आहे हे जर का आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगणे गरजेचे आहे ते म्हणजे मालदीव स्वतंत्र होण्याच्या आधीपासून भारताने मालदीवची प्रत्येक गरज भागवलेली आहे.
आजच्या दिवशी सुद्धा मालदीवला दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भारताकडूनच केला जातो. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर तिथे राजेशाही होती पण 1968 मध्ये मालदीव हा प्रजासत्ताक देश बनला. आता त्यांना जे काही तांदूळ लागतात, मसाले लागतात, फळे लागतात ,भाज्या लागतात, पोल्ट्री लागते किंवा त्यांच्या देशातला प्रत्येक खाद्यपदार्थ हा भारताकडून पुरवला जातो. त्यांच्या इथं मेडिकल सुद्धा भारताकडून जाते. औषधांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा हा भारताकडूनच केला जातो आणि म्हणूनच मालदीव साठी भारत हा फार औषधांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा देश आहे म्हणूनच मालदीव साठी भारत हा फार महत्त्वाचा आहे. भारताने मालदीव मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे सिमेंट त्यांना भारताकडून जातं, दगड सुद्धा भारताकडून जातो, त्यांच्या इथे घर बांधण्यासाठीच मटेरियल जे आहे बेसिक ते भारताकडून पुरवलं जातं, तिथल्या शाळा व तिथले हॉस्पिटल साठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट भारताकडून त्यांना पुरवले जाते आणि त्यांच्या इथं इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे सुद्धा भारताच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे.
या देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळे आणि बेट विखुरलेली असल्यामुळे या देशांमध्ये कोणत्याही मोठ्या शैक्षणिक संस्था नाहीत आणि म्हणून मालदीव मध्ये युवक आणि युवती त्यांच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी भारतावर अवलंबून आहेत आणि भारताकडून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती दिले जाते आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा मालदीव अनेक वस्तूंसाठी भारतावरती अवलंबून आहे आणि म्हणूनच भारत त्यांचा प्रमुख व्यापारी भागीदारी आहे. मालदीव मधून भारताला विशेष अशी काही निर्यात होत नाही पण मालदीवला मोठ्या प्रमाणात भारताकडून निर्यात केली जाते. दोन्ही देशांमधला एकूण व्यापार हा 50 कोटीच्या आसपास आहे.
याच्यातले 49 कोटी हे भारताची मालदीवला होणारी निर्यात आहे, म्हणजे मालदीव हा भारतावरती किती मोठ्या प्रमाणात डिपेंडंट आहे हे याच्यातून लक्षात येईल. आपत्तीच्या वेळेस सुद्धा भारत वेळोवेळी मालदीवच्या मदतीला धावून गेलेले आहे. 1988 मधे तत्कालीन अध्यक्ष अब्दुल गईम यांच्या विरोधात तिथे सत्ता पारटाचा प्रयत्न झाला होता, त्यावेळेस भारताने त्यांच्या मदतीसाठी आपल्या सैन्य पाठवलेलं होतं. यासोबतच हिंदी महासागरामध्ये मालदीवचं स्थान जे आहे हे फार महत्त्वाचा आहे एकूण जो काही सागरी व्यापार चालतो या सागरी व्यापारामध्ये मालदीवचं स्थान महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच भारतासाठी मालदीव हा फार महत्त्वाचा आहे आपल्या एकूणच सागरीत सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे.
आता बघा गेल्या काही वर्षांपासून वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह आणि त्यांचा जो काही चीनचा प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी सुरुवातीला बांगलादेशचा चितगाव कोड जे आहे ते डेव्हलप केलं. श्रीलंके मधला हंबनटोटा कोर्ट डेव्हलप केलं नंतर पाकिस्तान डेव्हलप केलं नंतर त्याने त्यांचा मोर्चा स्पेशल कळवला आणि आता मालदीवकडे वळवण्यात येते. या सर्व गोष्टी करण्यामागे चीनचा हात इतकाच आहे की भारताला जास्तीत जास्त हिंदी महासागरांमध्ये येथे त्यांना अडकवून ठेवायचं पॅसिफिक ओशन मध्ये भारताला घुसखोरी करू द्यायची नाही!
अमेरिकेला मदत करू द्यायची नाही हे त्यांचे एकूण धोरण राहिलेलं आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये चीनला त्याच्यामध्ये बाकी देशाने सहकार्य केल्यामुळे अपेक्षित असे यश सुद्धा मिळताना दिसेल. गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये चीन नेबमोठ्या प्रमाणामध्ये मालदीव मध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे सत्तेवर आल्यापासून आणि त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे बेल्ट अँड रोड इन याच्या माध्यमातून चीनने मालदीवला बरोबर त्यांच्या कचाट्यामध्ये ओढलेला आहे. आधी त्यांनी श्रीलंकेला ओढलं होतं नंतर पाकिस्तानाला आणि आता मालदीवचा नंबर लागलेला आपल्याला दिसून येते. ट्रॅप मध्ये मालदीव अडकतोय हे मालदीवला सध्या तरी लक्षात येत नाहीये पण मालदीवच्या आसपास चीनच्या ज्या काही हालचाली वाढलेल्या आहेत त्या मात्र भारतासाठी नक्कीच त्रासदायक आहेत.
भारताला आपला सागरी डॉमिनन्स जो आहे तो टिकून ठेवण्यासाठी यासोबतच आपली सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदी महासागरावरती लक्ष ठेवूने गरजेचे आहे. मी मागे सुद्धा म्हणलं होतं हिंदी महासागराला आपण इंडियन ओशन म्हणतो तर तो इंडियन ओशन नाही तो इंडियाज ओशन आहे हेच निश्चित करण्यासाठी भारताला या ठिकाणी आपलं स्थान मजबूत करण्यासाठी मालदीव आणि त्या ठिकाणी आपला असणारा बेस हा फार महत्त्वाचा आहे आणि चीनचा एकूण प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा मालदीव महत्त्वाचा आहे, आता बघा आपल्याला या एकूण वर्णनावरून हेच लक्षात येते की मालदीव साठी भारत फार महत्त्वाचा आहे आणि भारतासाठी सुद्धा एकूण सुरक्षेच्या दृष्टीने मालदीव फार महत्त्वाचा आहे आता दोन्ही देशांमध्ये जो काही तणाव निर्माण झालेला आहे हा तणाव जर का हलका करायचा असेल तर या संदर्भात चर्चा करूनच मार्ग काढता येऊ शकेल, पण सध्या तरी मालदीवचे अध्यक्ष जे आहे ते चीन प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत त्याच्यामुळे ते चर्चा करण्यासाठी कितपत तयार होतील या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच.