विमानांच्या उड्डानाला उशीर का होतोय?|प्रवासी नाराज का आहेत? Delhi Airport

विमानांच्या उड्डानाला उशीर का होतोय?

रविवार 14 जानेवारी ची रात्र ठिकाण मुंबई विमानतळाची धावपट्टी म्हणजे विमान टेकऑफ करतात उतरतात तो रनवे. या रणवेवर इंडिगो चे विमान उभा आहे आणि त्याच्या आजूबाजूला जमीनीवर प्रवासी बसले आहेत.
कोणी खातय कुणी मोबाईल मध्ये बघतय तर दुसरा विषय इंडिगोच्या दिल्लीवरून गोव्याला जाणारा फ्लाईट मधला रविवारी संध्याकाळी त्या फ्लाईटचा पायलट अनाउन्समेंट करायला प्रवाशांपुढे येतो आणि एक प्रवासी गर्दीतून पुढे त्याला चापड मारतो.

तिसरा विषय बंगलोरच्या केंपेगोवडा इंटरनॅशनल एअरपोर्टचा हा सुद्धा रविवारचा गर्दीच्या वेळी बेंगलोरच्या रस्त्यावर जेवढे ट्राफिक नसतंय तितकी गर्दी इथल्या एअरपोर्टवर आहे. कुठे फ्लाईट आठ तास दिली होती कुठे 12 तर कुठे थेट कॅन्सलच, बर हा विषय फक्त रविवारचा नाहीये तर मागचे काही दिवस भारतात ठीक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पण हे सगळं होतंय कशामुळे विमानांचा नेमका काय विषय झालाय पाहुयात.

लोकांना रनवेवर जेवायला का लागलं आणि त्याचे परिणाम नक्की काय झाले तर रविवारी सकाळी दहा वाजून सहा मिनिटाला गोव्यावरून दिल्लीला इंडिगो ची फ्लाईट निघणार होती पण या फ्लाईटला बारा तास उशीर झाला. रात्रीच्या दहा वाजता गोव्यावरून फ्लाईट निघाली पण दाट धुके असल्याने पुढच्या तासाभरात हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले, त्यानंतर प्रवासी विमानातून उतरून बाहेर आले आणि रनवेवर बसले आणि तिथेच खायला देखील सुरुवात केली आणि त्याचवेळी या प्रवाशांच्या आजूबाजूंना विमान उडत होती ज्यामुळे साहजिकच या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर इंडिगो एअरलाइन्सने स्पष्टीकरण देत प्रवाशांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये जायला नकार दिला आणि विमानाला शिडी लावल्यावर रणवेवरच बसले.

इंडिगो ने या प्रकरणात माफी मागितली असली तरी ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी ना इंडिगो एअरलाइन्सला आणि मुंबई एअरपोर्ट अथोरिटीला कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे, पण या विमानाच्या राड्यात सगळ्यात जास्त गाजलेला किस्सा कुठला होता तर इंडिगो च्या फ्लाईट मध्ये पायलेटला झालेली मारहाण.

रविवारी सकाळी सात वाजून 40 मिनिटाला दिल्लीवरून गोव्यासाठी फ्लाईट निघाली होती मात्र दिल्लीतल्या धूक्यांमुळे ही फ्लाईट निघायला १३ तास उशीर झाला. याच दरम्यान एक किस्सा घडला, उशीर होते हे सांगण्यासाठी पायलट पुढं आला आणि प्रवाशांपैकी एक असणाऱ्या साहिल कटारिया न पायलट ला कानामाघे क्हापट मारली. या सगळ्याचा व्हिडिओ फ्लाईट मध्ये असलेल्या एका रशियन मॉडेल ना रेकॉर्ड केला व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत कटारियाला ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर त्याने पायलटची हात जोडून माफी देखील मागितली.

कटारिया आपल्या पत्नीसोबत गोव्याला हनिमूनला चालला होता पण विमान निघायला उशीर होत असल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने पायलटला मारहाण केली हे कारण त्यांनी पोलिसाला देखील सांगितले.मात्र हे सगळं रेकॉर्ड करणाऱ्या रशिअन मॉडेल ने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर करत सगळ्या घटनाक्रम सांगितला.

तिच्या म्हणण्यानुसार फ्लाईट सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी निघणार होती पण आम्ही एअरपोर्टवर पोहोचल्यावर आम्हाला फ्लाईट ला दोन तास उशीर होईल असं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात पुढचे दहा तास आम्हाला फ्लाईट मध्ये जाऊन दिलं नाही. त्यानंतर फ्लाईट मध्ये बसल्यावर आणखी दोन तास उशीर होईल असं सांगायला खूप पायलट पुढे आला आणि प्रवाशांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा पायलटण तुमच्यामुळेच उशीर झालाय आणि तुमची चुकी आहे असं विधान केलं आणि चिडलेल्या प्रवाशांना त्याच्यावर हात उचलला. हो पायलटला मारहाण करणारा साहिल कटारियावर कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आलेला आहे, पण यातही इंडिगो व्यवस्थापनावरच टीका केली जाते.
तुमच्या ओळखीतलं कोणी मागच्या काही दिवसात एअरपोर्टवर गेले असेल तर त्याला गर्दीचा अनुभव फिक्स आला असणार. टर्मिनल लावून पूर्ण पॅक झालेल्यात बोर्डिंग काउंटरच्या इथं लोकांचा घोळका उपाय बऱ्याच ठिकाणी चिडलेले प्रवासी आणि फ्लाईट कंपन्यांमधील बाचाबाची देखील बघायला मिळते.

या सगळ्यांचे एक कॉमन कारण आहे ते म्हणजे फ्लाईटला होणारा उशीर. यावर तोडगा काढण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानाला तीन तासापेक्षा जास्त उशीर झाला तर फ्लाईट रद्द करण्यात यावी. त्याच्या परताव्याबद्दलचे निकष तिकिटावरच लिहिलेल्या असावेत असे आदेश दिलेले आहेत. या सगळ्यात झाले काय तर एकट्या दिल्ली विमानतळावरून मागच्या दोन दिवसात जवळपास 600 ऊन जास्त फ्लाईट उशिरा निघालेल्या आहे. तर जवळपास 100 फ्लाइट्स कॅन्सल झालेल्या आहेत.

उत्तर भारतातल्या इतर विमानतळांवर देखील थोडाफार प्रमाणात अशीच परिस्थिती आहे याचा परिणाम देशभरातल्या फ्लाईटच्या वेळापत्रकावर देखील झालेला आहे पण हा उशीर नेमका होतोय कशामुळे तर याचे मुख्य कारण आहे दिल्ली आणि परिसरात पसरलेल्या दाट धोक्यांमुळे दृश्य मानतात कमी झाल्याने दिल्ली विमानतळावरून विमान उशिरा उड्डाण करतात.

दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाणारी विमान दिल्लीतल्या वातावरणामुळे उशिरा निघतात आणि या सगळ्यांचा फटका सगळ्याच विमानांच्या वेळापत्रकाला बसतोय पण फक्त धुकं हेच एक कारण तर नाही. दिल्ली विमानतळा बद्दल बोलायचं झालं तर इथे लो बिजिबिलिटी वेळी लँडिंगला मदत करतील. एक धावपट्टी सध्या मेंटेनन्स काम सुरू आहे त्यामुळे आधीच गोंधळाची परिस्थिती असताना एक धावपट्टी कमी पडत असल्याने दिल्ली विमानतळाला सुविधांची कमतरता जाणवली आहे. त्यात एकाच विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने तिथे नियोजित लँडिंग देखील होत नाहीये आणि गोंधळात आणखीनच भर पडते. त्याचं उदाहरण सांगायचं तर मुंबई विमानतळाला धोक्याचा फटका बसत नसला तरी देखील नियोजनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे येथून 362 फ्लाईट उशिरा निघालेल्या आहेत आणि त्या फ्लाईट कॅन्सल देखील झालेल्या आहेत,पण प्रवाशांमुळे गोंधळ वाढतोय हे सुद्धा नाकारून चालणार नाही.

फ्लाईट मध्ये चढल्यावर फ्लाईटला उशीर होणार हे लक्षात आल्यानंतर लोक फ्लाईट मध्येच बसून न राहता खाली उतरायची मागणी करतात पण विमानात चढणं आणि उतरण हे एसटी बसवून उतरण्यासारखं सोप्पं नसतं. एकदा काय बोर्डिंग पास चेकिंग लगेज ठेवणं या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा प्रवाशांना बाहेर सोडणं अवघड ठरतं आणि गोंधळात भर पडते. प्रवाशाला विमानातून खाली उतरायचं असेल तर त्यासाठी विमानतळाच्या सुरक्षे कडून मंजुरी आवश्यक असते कारण, विमानात बोर्डिंग पूर्ण केल्यानंतर प्रवाशांचा सामान आधीच विमानात भरलेला असत प्रवाशांना उतरून ते टर्मिनल वर थांबू शकतील त्यासाठी त्यांना विमानतळाच्या सुरक्षितून जावं लागतं आणि एअरलाइन द्वारे त्यांना पुन्हा चेक इन करावा लागतं.

आता याशिवाय विमानाचे कृ मेंबर्स, पायलट, को पायलट हे देखील माणसंच आहे. विमानाच्या उडानाला उशीर झाला किंवा फ्लाइट्स रद्द झाली तर त्यांना देखील विमानासोबतच थांबावं लागतं. फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नुसार विमानतळावर गर्दी जास्त असेल तर त्यांना देखील जास्त काळ काम करावं लागतं पण फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नुसार घालून दिलेली वेळेची मर्यादा ओलांडल्यानंतर फ्री नंबर्स ना विमान हाताळण्याची आणि पायलटला विमान उडवण्याची देखील परवानगी नसते कारण, या गाईडलाईन्स नुसार विमान उडवण्यासाठी ठराविक काळ विश्रांती घेणे आवश्यक असतं.

आता धुक्यांमुळे विमान उड्डाणाला उशीर होते त्याचा परिणाम त्यांच्यावर देखील होत आहे ते सध्या प्रचंड तणावाखाली आहे आणि प्रवाशांच्या अशा वर्तणुकीमुळे यात अजूनच भर पडते त्यामुळे ही परिस्थिती हाताळताना प्रवासी आणि विमान कंपन्या दोघांनी देखील सहकार्याची आणि समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे.

विमानाला उशीर होणार असेल तर प्रवाशांना घरून निघण्याच्या आधीच विमान कंपन्यांनी तसेच सांगितलं पाहिजे जेणेकरून विमानतळावर येऊन गर्दी करणार नाही. उशीर झालाच तर प्रवाशांना खाण्यापिण्याची देखील काळजीकंपन्यांनी घेतली पाहिजे. सरकारने देखील लोक्यांची परिस्थिती ओळखून लोक विजिबिलिटीच्या काळात देखील विमान उडान करू शकतील असे रणवे तयार करण्यावर भर दिला पाहिजे त्यामुळे अशा घटना टाळता येऊ शकतात.

Leave a Comment