राहुल गांधीला मंदिरात जाण्यापासून अडवलं । बघा काय आहे कारण । Rahul Gandhi | Ayodhya

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला एकीकडे राम मंदिराचा हा सोहळा होत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आसाम मधल्या एका मंदिराच्या बाहेर बसल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आसाम मधल्या संत शंकरदेव मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी राहुल गांधींना अडवण्याचा समोर आलं. माझी चूक काय मी मंदिरात का जाऊ शकत नाही असे प्रश्न राहुल गांधी या व्हिडिओमध्ये पोलिसांना विचारताना दिसताय. आता राहुल गांधींना या मंदिरात जाण्यासाठी प्रवेश का नाकारण्यात आला त्या मागची नेमकी कारण काय याचीच माहिती आपण जाणून घेऊया.

मणिपूर मधून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडून न्याय यात्रा आसाम मध्ये 22 जानेवारीला होती, 21 जानेवारीला राहुल गांधींच्या नेतृत्वात ही यात्रा आसाम मधल्या नगाव जिल्ह्यात आली. या जिल्ह्यातल्या भरद्वाथा येथे एक वैष्णव मंदिर आहे. ते वैष्णव संत श्रीमंत शंकर देव यांचा जन्मस्थान आहे. या जन्मस्थानाला भेट देणं हा राहुल गांधींच्या यात्रेमधला पूर्वनियोजित कार्यक्रम होता.

11 जानेवारीला काँग्रेसच्या काही खासदार आणि आमदारांनी या मंदिराच्या प्रमुखांची भेट घेतली यावेळी त्यांनी 22 जानेवारीला राहुल गांधींना संत शंकर देवांचा दर्शन घेण्याची परवानगी मागितली त्यावेळी या मंदिराच्या प्रमुखांनी त्यांना 22 जानेवारीला दर्शनाचा निमंत्रण दिलं होतं, असं असताना 22 जानेवारीला सकाळी राहुल गांधींना मंदिराच्या आत प्रवेश देता येणार नाही असं स्थानिक प्रशासनाकडून आदल्या दिवशी सांगण्यात आलं.

22 जानेवारीला आयोध्यात होणारा राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यावर दुपारी तीनच्या नंतर राहुल गांधींना मंदिरात प्रवेश मिळेल असं स्थानिक प्रशासनाकडून कळवण्यात आलं. पण कार्यक्रम ठरलेला असल्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते 22 जानेवारीला सकाळी सात वाजता मंदिरात जायला निघाले,त्यावेळी पोलिसांनी बॅलिकेट टाकून त्यांना अडवलं तुम्हाला तीनच्या नंतरच मंदिरात प्रवेश मिळेल असं पोलिसांकडून त्यांना पुन्हा एकदा सांगण्यात आलं. त्यावेळी राहुल गांधी पोलिसांवर संतापले मला संत शंकर देवांचं फक्त दर्शन घ्यायचंय, त्यांना हात जोडायचे, मला तुम्ही आधीच परवानगी दिली आहे, मग आता माझी चूक काय असे सवाल राहुल गांधींनी पोलिसांना केले. तसेच आज कदाचित एकाच व्यक्तीला मंदिरात प्रवेश असेल असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना नाव न घेता मंदिराला लॉक सुद्धा लावला. त्यानंतर राहुल गांधी कार्यकर्त्यांसोबत मंदिराच्या बाहेरच राम भजन गात बसून राहिले.

संत शंकर देव हे आमचे गुरु आहेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालतोय तिथे आल्यावर त्यांच्या पायावर डोकं टेकण्याची माझी इच्छा होती पण आता इथे मला त्यांचा दर्शन घेण्यापासून अडवलं जाते, बाकी सगळ्यांना या मंदिरात प्रवेश आहे फक्त मलाच नाही. राज्य सरकारच्या पोलीस प्रशासनावर असलेल्या दबावामुळे मला अडवलं जातंय असा आरोप आहे. राहुल गांधींनी यावेळी केला पण राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारण्यामागचा नेमकं कारण काय ते आता बघूया.

आता मध्ये सध्या भाजपचा सरकार आहे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाम मध्ये आल्यानंतर भाजपकडून त्यांना विरोध करण्यात आला त्यातच आसामचे मुख्यमंत्री श्रीमंत विश्वास शर्मा यांनी रविवारी एका संमेलनात राहुल गांधींनी 22 जानेवारीला बोरगाव येथे संत शंकर देवांच्या मंदिरात जाऊ नये असं म्हटलं होतं.

राहुल गांधींनी जर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी शंकर देवांचे दर्शन घेतलं तर त्यातून प्रभू श्रीराम आणि संत शंकर देव यांच्यात अनावश्यक स्पर्धा लावल्याचा चुकीचा संदेश जाईल हे आसामच्या प्रतिभेला शोभणार नाही, राहुल गांधींना जरी आमंत्रण आलं असलं तरी सगळ्या देशाचं लक्ष अयोध्याकडे लागलेला असताना ते आसाम कडे वळवण योग्य नाही, काँग्रेसमध्ये सुद्धा हिंदू नेते आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीचं गांभीर्य कळू शकतं, असं सरमा म्हणाले होते, त्यामुळे राहुल गांधींनी दुपारनंतर किंवा संध्याकाळी संत शंकर देवांचे दर्शन घ्यावं अशी विनंती आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला केली होती पण, भारत जोडून न्याय यात्रेचे टप्पे ठरलेले असल्यामुळे सकाळी ते नगाव जिल्ह्यातून पुढे गेल्यानंतर पुन्हा दुपारी नगाव मधल्या बर्दवा इथे यायला पुन्हा शंभर किलोमीटर मागे लागलं असतं, त्यामुळे काँग्रेसने सकाळीच दर्शन घ्यायचा कार्यक्रम ठेवला पण, पोलीस प्रशासन आणि मंदिर कमिटी ही मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाच्या दबावाखाली येऊन राहुल गांधींना थांबवत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केला.

या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर या आंदोलन केलं मात्र राहुल गांधींना शंकर देवांचं मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही शेवटी काँग्रेसच्या स्थानिक खासदार आणि आमदारांनी संत शंकर देव यांचा दर्शन घेतल्यानंतर काँग्रेसची भारत जोडून न्यायात्रा नगाव जिल्ह्यातून पुढे सरकली आता ज्यांचं दर्शन घेण्यासाठी शंकर देव यांचा जन्म इसवी सन १४४९ मध्ये आसामच्या नगाव विद्या बरदोबा जवळ असलेल्या अलीपुखरी येथे एका शिरोमणी कुटुंबात झाला शंकरदेव यांना आसाम मध्ये अग्रणी समाज सुधारक सुद्धा म्हटलं जातं. पंधरावा आणि सोळाव्या शतकात त्यांनी आसामध्ये फार मोठं कार्य केलं,
बाराव्या वर्षी भाषेतली स्वर आणि व्यंजन शिकायच्या आधी त्यांनी आपली पहिली काव्यरचना केली. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्या सूर्यवंशी यांच्याशी लग्न झालं पण मुलीच्या जन्मांतर सूर्यवती यांचे निधन झालं त्यामुळे मग श्रीमंत शंकर देव अध्यात्माकडे वळले. त्यांनी भ्रमंती करत भागवत पुराणाचा अभ्यास केला जेव्हा ते आपल्या मूळ गावी आले तेव्हा त्यांनी आपलं शिरोमणी पद नाकारलं आणि बारदोवा इथे एक प्रार्थना शाळा सुरू केली, तिथे त्यांनी कीर्तनातून लोकांना उपदेश दिले त्यांच्या या उपदेशांचा आसाम मधल्या जनतेच्या मनावर मोठा प्रभाव पडला. समाज प्रबोधन करणारे शंकर देव संत झाले. इतकच नाही तर नाटककार कवी लेखक संगीतकार नर्तक समाजसुधारक अशी त्यांची ओळख निर्माण झाली, अनेक रचना मधून त्यांनी समाजप्रबोधनाच काम केलं.

आसामच्या स्त्रिया या सांस्कृतिक नृत्य शैलीचे जनक सुद्धा श्रीमंत शंकर देवत आहे, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आसाम सरकारने त्यांच एक मंदिर उभारलं पण या सगळ्यापेक्षा शंकर जवळ लक्षात राहता ते त्यांनी केलेल्या अस्पृश्यता निवारण संबंधित कामामुळे.

महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाचं काम सुरू करण्याच्या कित्येक शतका आधी म्हणजे पंधराव्या शतका त्यांनी अस्पृश्यता निवारणाबद्दल कामाला सुरुवात केली होती. जातीमुळे होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी शंकर देवांनी धार्मिक तत्त्वज्ञानाचा पर्याय निवडला, समाजात असलेल्या आर्थिक विषयामध्ये त्यांनी भाष्य केलं होतं. पंधराव्या शतकात शेती हेच अर्थकारणाचा प्रमुख साधन होतं पण शेती हे जगण्याचा एकमेव साधन असू शकत नाही याची जाणीव शंकर देवांना होती त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या लाकडी मूर्ती मुखवटे हत्तीच्या दातांनी बनवलेले शितल, पलंग फुलांचे पंखे, वृंदावनी कपडे ,चिन्ह जत्रा ,सप्त वैकुंठाची प्रतिमा, बिल्डिंगची कला, पुस्तकांच्या निर्मितीसाठी साथीची पाने तयार करण्याची शैली अशा विविध कला शिकण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं, त्यामुळे आता समाज आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकला.

शंकर देव हे ईशान्य भारतातील पहिले क्रांतीकारक होते. सामाजिक मूल्य बदलणे आणि त्या ऐतिहासिक बदलांसाठी वातावरण निर्माण करून संपूर्ण समाजाचा विकास करणे हेच त्यांच्या क्रांतीच मुख्य सूत्र होतं. शंकर देवांनी समाजाच्या प्रत्येक स्तरात नाविन्यता आणि सुधारणा घडवून आणल्या त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही आसाम मध्ये आहे, त्यामुळेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी राहुल गांधी शंकर देव यांच्या मंदिराला भेट देणार होते पण त्यांना ही भेट नाकारण्यात आली. आता राहुल गांधींना संत शंकर देव यांच्या मंदिरात प्रवेश नाकारण्याच्या आसाम सरकारच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment