अभिनेत्री तापसी पन्नू ने केले लपवून लग्न | Taapsee Pannu Marrige

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अखेर विवाहबंधनात अडकली असल्याचे वृत्त आहे. तापसीने उदयपूर (Udaipur) येथे गुपचूपपणे लग्नगाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये 23 मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे. टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बो (Mathias Boe) सोबत तिने विवाह केला. तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

तापसी माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर दहा वर्षांपासून रिलेशनशिप होती. आता या जोडप्याने लग्न केल्याचं म्हटलं जातंय. तापसीने व मॅथियस यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं. पार्टीला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच हजर होते. अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों लग्नाला उपस्थित होते, असं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तापसी पन्नूच्या या विवाह सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. सिनेइंडस्ट्रीमधून अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लो यानांच आमंत्रित करण्यात आले होते. अनुराग कश्यपने तापसीची भूमिका असलेल्या मनमर्जियां, दोबारा आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.
तर, कनिका ढिल्लन तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’, ‘मनमर्जियां’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ सारख्या चित्रपटांची पटकथा लेखक आहे. कनिकाने तिच्या पतीसोबत अभिनेत्रीच्या लग्नाला हजेरी लावली होती आणि सोशल मीडियावर तापसीची बहीण शगुन आणि तिच्या चुलत बहिणीसोबतचा फोटो शेअर करून या जोडप्याच्या लग्नाबाबतचे संकेतही दिले.
कोण आहे तापसीचा नवरा…

तापसीचा ‘थप्पड’ मधील सह-कलाकार पावेल गुलाटी याने लग्नाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये अभिनेता अभिलाष थापियाल देखील दिसतोय. तापसी लवकरच मित्रांना मुंबईत लग्नाची पार्टी देणार आहे, अशी चर्चा आहे.

कुटुबांशी निगडित असलेल्या सूत्रांनी माहिती दिली की, दोघांचे विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला. हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. लग्नाशी संबंधित कार्यक्रम हे 20 मार्चपासून सुरू झाले होते. आपल्या लग्नाची मीडियामध्ये चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही जोडप्यांनी खबरदारी घेतली होती. हे दोघेही मीडिया आणि लाइमलाइटपासून अंतर ठेवणारे असल्याचेही या सूत्राने म्हटले.

बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण नाही…

प्रियकर मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. 2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून रुपेरी पडद्यावर झळकली

तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 मध्ये तापसीने ‘झुम्मंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तापसीने 2013 मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटामधून पदार्पण केले होते. ‘जुडवा 2’, ‘गेम ओव्हर’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ आणि ‘शाबाश मिठू’ असे अनेक चित्रपट आहेत.