(जन्म: १९१६ – मृत्यू: २००६)
कोणत्याही मंगल प्रसंगाची सुरुवात बिस्मिल्लाखाँ यांच्या सनईनेच होते. त्यांची हि कला फार उच्चकोटीची आहे. सनईवादनाच्या अनेक ध्वनिफिती, रेकॉर्डस् अत्यंत लोकप्रिय आहेत. बिस्मिल्लाह खाँसाहेबांनी सिध्द केले आहे की सनईवादनाचा स्वर आणि मधुरता कोणत्याही वाद्यापेक्षा कमी नाही.
सनईची लोकप्रियता खाँसाहेबांमुळेच व त्यांच्या प्रयत्नांमुळे उदयास आली. सनईवादन आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले याचे कारण म्हणजे खाँसाहेबांची नैसर्गिक प्रतिभा आणि त्यांचे अथक प्रयत्न. यामुळे त्यांचे वादन आजही प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत आहे. वादनात रंजकता तशीच प्रसन्नताही आहे.
खाँसाहेबांचा जन्म संगीतप्रिय, वादनप्रिय असलेल्या घराण्यात झाला. वाराणसीजव भोजपूर हे त्यांचे गाव. त्यांचे पिताजी पैगंबर बक्ष हेसुध्दा उत्तम सनईवादन करत. त्यामु घरातच सनईवादनाचे संस्कार होत होते.
वादन शिकण्याची सुरुवात अलीबक्ष यांच्याबा केली. गायन-वादनाच्या दोन्ही तालमी एकाच वेळी सुरू झाल्या. तासन्तास खाँसा संगीतसाधना करत.
सतरा अठरा वर्षांचे असतानाच ते उत्तम कलाकार झाले. १९२६ मा अलाहाबाद विश्वविद्यालयाने आयोजित केलेल्या संगीतसंमेलनात प्रथमच जाहीर कार्यान ऐकून सर्व संगीतज्ञ आश्चर्यचकित झाले. सर्वत्र ख्याती पसरू लागली. खाँसाहेबांचे वडीलब शहनाई वादन करत असत. दोघे भाऊ एकत्र कार्यक्रम करत. बनारसमध्ये शहनाईक शिकवण्यासाठी त्यांनी एक विद्यालय स्थापिले.
बिस्मिल्लाखाँ यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक देशात पेश केले. रूस, अफगाणिस्तान, जपान, अमेरिका सर्वत्र यशस्वी शहनाईवादन ऐकवले. १९५६ साली राष्ट्रपतींद्वारा त्यांना सन्मानित करण्यात आले. १९६८ मध्ये संगीत नाटक अकॅडमीतर्फे सन्मानित करण्यात आले.
भारतामध्ये सर्वत्र शहनाईवादन चालू होते. आकाशवाणीवर रोजच कार्यक्रम प्रसारित होत. खाँसाहेब शास्त्रीय संगीत कुशलतेने वाजवतच शिवाय त्यांच्या उपशास्त्रीय लोकधुना लोकप्रिय आहेत. खाँसाहेबाचा स्वरलगाव इतर वादकांपेक्षा वेगळा असे. स्वरांची बढत परंपरागत ढंगात होई परंतु स्वरकल्पना, उपज अद्वितीय, आकर्षक व रसनिर्मिती करणारी होती. तिहाई, मीड, स्पर्शस्वर, स्वरालंकाराची बढत दिलखेचक होती.
आपल्या शिष्यांनाही ते प्रेमाने शहनाई शिकवत. वादनाबरोबर ते सुरीले गायक होते. गंगाकिनारी मंदिरात बसून शहनाईवादन करुन पवित्र वातावरण निर्माण होत असे. ते शहनाईने असे काही स्वर भरत की एखादा साधू-संगीतज्ञ स्वरांमधून परमेश्वराची पूजा करत आहे हे दृष्य प्रेक्षणीय, आदरणीय व मन प्रसन्न करणारे होते.
संगीत क्षेत्रात बिस्मिल्लाह खाँसाहेबांचे योगदान फार मोठे आहे. शहनाई वादनातली एक स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. शहनाईवादनाला खुर्दक नावाचे तालवाद्य घेतात. अलिकडे तबलावाद्यही साथीला घेतात. याशिवाय त्यांचे पुतणे तबलावादनात तरबेज झाले. ते तबलावाद्याची साथ करत. ‘गूँज उठी शहनाई’ या सिनेमामध्ये खाँसाहेबांनी वादन केले आहे.