तलाठी भरती परीक्षेत घोटाळा:
5 जानेवारी रोजी तलाठी भरती चा निकाल जाहीर झाला आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना 200 पैकी जास्त मार्क मिळालेले असल्यामुळे याच्यातून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले.
संध्याकाळी तलाठी भरतीची परीक्षा आणि त्याच्यात होणारा घोटाळा ही आता महाराष्ट्रातील नेत्याची बाब झालेली आहे असं सुद्धा म्हणलं जाते.
आता तलाठी भरती संदर्भातली पेपर फुटी असो यासंदर्भात पेपर पुरवणारे रॅकेट असो नाहीतर तलाठी म्हणून जॉइनिंग झाल्यानंतर दोन-तीन वर्षानंतर काहीतरी समोर आलेला मॅटर असतो. एकूणच तलाठी भरतीची जी परीक्षा पद्धती आहे त्याच्या वरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आपल्याला दिसते की यावेळेस 200 मार्काची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन या पद्धतीचा वापर केला गेला.
याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना 200 पैकी 210, 211, 214 असे मार्क्स मिळालेले दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप होताना दिसून येतोय. आज आपण या संपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत या सोबतच ज्यांनी परीक्षा दिली ते विद्यार्थी नेमके काय आरोप करतायेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत.
तलाठी भरतीसाठी मागील वर्षी 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर यादरम्यान ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली होती नऊशे रुपये प्रति फॉर्म या हिशोबाने जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी याच्यासाठी फॉर्म भरले होते आणि या परीक्षेचा निकाल जो पाच जानेवारीला जाहीर झाला या परीक्षेच्या निकालामध्ये 200 पैकी जास्त मार्क म्हणजे 200 पैकी 210, 211 असे मार्क जे आहे, ते 48 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत,
या एकूणच परीक्षेच्या निमित्ताने आणि ह्या घोटाळ्याच्या निमित्ताने काही प्रश्न आता उपस्थित केले जातात त्या त्या जिल्ह्यामध्ये तिथलं जिल्हा निवड मंडळ तलाठी भरतीची परीक्षा इतकी वर्ष घेत असताना सुद्धा टीसीएस मार्फत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने का घेण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. प्रत्येक वर्षी थोड्या थोड्या अंतराने जागा काढणे शक्य असताना एकाच वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात जागा का काढल्या गेल्या आणि हे मार्क देण्यासाठीची नॉर्मलायझेशनची पद्धत नेमकी आहे काय असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता ही पद्धत जर का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविषयीची ऑथेंटिक अशी माहिती काही उपलब्ध होत नाहीये. या एकूण परीक्षा पद्धतीविषयीची चर्चा सुरू झाल्यानंतर म्हणजे मोठ्या प्रमाणात आता गोंधळ होतोय या संदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. काहीजण असं म्हणते की पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क दिलेले आहे,तर मग याच्यानंतर परीक्षा ज्यांनी घेतली त्या परीक्षेचे समन्वयक यांनी प्रसिद्धी पत्र समोर आणलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तलाठी भरती परीक्षा टीसीएस मार्फत घेण्यात आली होती.
तलाठी भरतीसाठी किती उमेदवार होते?
ही तलाठी भरती परीक्षा तब्बल आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी दिली काठीण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याच्या पद्धतीमुळे उमेदवारांचे गुण वाढले आहेत सामान्य कृत गुण प्रसिद्ध करण महत्वाचे, जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल त्यावेळेस आरक्षण व सारखे गुण मिळालेले अनेक उमेदवार असतील, अशा उमेदवारांना सर्वाधिक सामान्य कृत गुण मिळाले आहे त्यांची निवड तर्क संगतीने करता येणं शक्य होतं, त्यामुळे नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडत नाही असं त्यांचं स्पष्टीकरण त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेली आहे ऑनलाइन असल्यामुळे कसं झालेले आणखी एकाच वेळेस इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा घेणं शक्य नाही म्हणून तसं झालं होतं त्याच्यामुळे काही शिफ्ट ची परीक्षा सोपी आहे काहींची अवघड आहे तर काहींची कमी अधिक प्रमाणात आहे.
प्रश्नांची पातळी जी आहे ती बदललेली आहे त्याच्यामुळे सामान्य करण नॉर्मलायझेशन केलं आहे. ही प्रक्रिया अनेक शासकीय परीक्षांमध्ये राबवली जाते त्याच्यामुळे अवघड पेपर गेलेल्या उमेदवारांना न्याय मिळतो तसंच समान गुण असलेल्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते त्याच्यामुळे निवड प्रक्रिया सोपी जाते असे हे एकूण स्पष्टीकरण त्यांनी केलेला आहे, तरीसुद्धा याच्यातून नेमकं नॉर्मलायझेशन आहे काय हे काही स्पष्ट होताना दिसत नाहीये. आता या परीक्षा समन्वयक जे आहेत त्यांच्या एकूण स्टेटमेंट मध्ये आपल्याला हेच लक्षात येते की त्यांचं उमेदवारांना न्याय देण्याचा हेतू होता पण न्याय देण्याचा हेतू असताना याच्यामध्ये पारदर्शकता दिसत नाहीये. असा सुद्धा आरोप होतोय की आता निकष जे आहेत ते लवकरात लवकर समोर येणे गरजेचे आहे या नॉर्मलायझेशनचे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधला संभ्रम जो आहे तो दूर होण्यास वाव मिळेल सुरुवातीपासूनची परीक्षा जी आहे ती वादाच्या भौऱ्यामध्ये अडकलेली आहे आता सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये वाद याच्यामुळे निर्माण झाला होता की याच्या साठीची फीस जास्त होती फॉर्म भरत असताना 900 रुपये प्रत्येक उमेदवाराने द्यायचे होते आणि ९०० गुणिले १० लाख या पद्धतीने हे पैसे शासन दरबारी जमा झाले.
तलाठी भरती फॉर्म साठी 900 रुपये इतकी फिस आकारण्यात जी येत होती त्याच्यावरून तो वाद झाला होता तो वाद थांबतोय त्याच्यानंतर पेपर फुटीचा वाद सुरू झाला, नंतर पैसे घेऊन कोणाला पेपर पुरवले जात आहेत असा वाद सुरू झाला आणि आता हा नवीन वाद समोर आलेला आहे. मधल्या काळामध्ये काही विद्यार्थी कोर्टामध्ये सुद्धा गेलेले होते आणि आता 5 जानेवारी चा निकाल आल्यानंतर या निकालामध्ये ओएमआर शीट वरती प्रत्येक विद्यार्थ्याला नेमके किती मार्क्स आहेत हे सुद्धा समोर आलेला नाहीये, त्याच्यामुळे शीट वरती नेमके किती मार्क आहेत हे समोर यायला हवी अशी मागणी विद्यार्थ्याकडून होताना दिसते.
मुळामध्ये आता आपले इथे जर का आपण बघितलं एक तर शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसते. कुठलीही शासकीय नोकरीची जाहिरात आली तर त्याच्यासाठी लाखोंनी फॉर्म येताना दिसेल राज्यसेवेचा विषय घ्या! किंवा पीएसआय चा विषय या याच्यासाठी सरकारकडून खूपच कमी प्रमाणामध्ये जागा काढण्यात येतात.
भरतीसाठी सुद्धा प्रत्येक वर्षी काही प्रमाणात जागा काढणे शक्य असताना एकदाच भल्या मोठ्या प्रमाणात जागा काढल्या जातात आता जे विद्यार्थी वर्ष अभ्यास करत असतात ते काय करतात. मग अशा वेळेस की जर का जागा आलेल्या आहेत भरपूर तर त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात आणि लवकरच सिलेक्शन होईल हे सुनिश्चित करण्याचा ते प्रयत्न करतात या प्रत्येक विद्यार्थ्यावरती जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत या प्रत्येक विद्यार्थ्यावरती वर्षा गणित घरच्यांचं आणि ते जिथे राहतात तिथल्या आजूबाजूंचा मोरल प्रेशर जे आहे ते वाढत राहतात.
प्रायव्हेट सेक्टर मध्ये किती नोकऱ्या ?
प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकऱ्यानाहीयेत आणि असल्या जरी तरी सुद्धा त्या फिक्स नाही येत म्हणजे आपली अगोदरची जी पिढी होती ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करत असताना अगदी रिटायर होईपर्यंत ते त्याच कंपनीमध्ये किंवा त्याच ऑर्गनायझेशन मध्ये काम करू शकत होते पण आजच्या दिवशी प्रायव्हेट सेक्टर मध्ये अशी कुणालाही शाश्वती नाहीये. उद्या सकाळी मी कामावरती असेल किंवा नसेल याची सुद्धा शाश्वती नाहीये आणि म्हणूनच आता याउलट शासकीय नोकऱ्यांकडे जाण्यासाठीचा कल जो आहे तो वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय. अजून एक प्रश्न या भरतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जातोय तो म्हणजे सरकार इतक्या कमी प्रमाणामध्ये जागा का काढतात या एकूणच मार्केटचा जर का आपण अंदाज घेतला तर आपल्याला लक्षात येईल की काही हजार कोटींमध्ये हे स्पर्धा परीक्षांसाठीच मार्केट आहे.
आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या प्रत्येकाची अपेक्षाही होती की ह्यावर्षी काही ना काही तरी आपण पोस्ट काढणारे काही नाही म्हणलं तरी आपण तलाठी तर काढणारच आहे पण या नॉर्मलायझेशनची जी पद्धत वापरलेली आहे याच्यामध्ये जी पारदर्शकता त्या समन्वयकाकडून बाळगले गेले नाही याच्यामुळे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा सुवर्ण होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते.
या विद्यार्थ्यांच्या एका परीक्षेमध्ये 50 च्या आसपास मार्क आहेत म्हणजे एका विद्यार्थ्याने जर का वनसेवा आणि परीक्षा दिलेली आहे फॉरेन संदर्भातली तर तिथे त्यांना ५० च्या आसपास मार्केट तर दुसरीकडे दुसऱ्या परीक्षेमध्ये अगदी काही दिवसांच्या अंतराने 200 हून जास्त मार्क्स आहेत आणि याच्या विषयी सुद्धा खूप सारे जण राग उठवताना दिसत आहेत. पण आपल्याला त्या विषयामध्ये जायचं नाहीये त्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नाव घेण्याचं कारण नाहीये कारण की त्या ठिकाणी जी काही चूक झालेली आहे किंवा जी काही पद्धत गुणांची सरकारकडून वापरण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा दोष नाहीये आताही त्या विद्यार्थ्यांची चूक आहे सिस्टीमची चूक आहे की त्या गुण देण्याच्या पद्धतीची चूक आहे हे अजून क्लियर नाही झालेलं म्हणून विद्यार्थ्यांचं कोणत्याही नाव घेण्याचा काही कारण नाहीये या एकूणच परीक्षेच्या पद्धतीमध्ये सध्या तरी फार मोठा गोंधळ दिसतोय आणि हाच गोंधळ मागील परीक्षेच्या वेळेस सुद्धा झाला होता असे विद्यार्थी म्हणतात सरकार नोकर भरती करण्यासाठी प्रत्येक वेळेस शासनाजवळ पैसे नसण्याची अडचण सांगतात.
महाराष्ट्राकडे पैसे नाहीत का?
महाराष्ट्रासारख्या देशातील क्रमांक एकच्या राज्याकडे जर का पैसे नसतील तर मग नेमकं कोणत्या राज्याकडे पैसे असतील हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो. जर का राज्यातील प्रशासनासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी सरगर कडे पैसा नाही तर मग विकास कामांसाठी पैसा उभा करणे हे फार मोठा आव्हान सरकार समोर असणारे आणि विकास काम करायचे म्हणजे तर प्रशासन हे तिथं लागतात लागतं आता सरकारला येणाऱ्या काळामध्ये या तलाठी भरतीमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे याच्याविषयी स्पष्टीकरण द्यावे लागेल या संदर्भात योग्य तो न्याय द्यावा लागेल आणि ही परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक कशी होईल याच्याकडे लक्ष द्यावे लागते, आणि या सोबतच सरकारमध्ये जर का रिक्त पद असतील तर ती सुद्धा लवकरात लवकर भरावी लागणार आहेत आणि हीच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता बघुयात येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात होतंय काय? या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमुळे या गुण देण्याच्या पद्धतीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये रोश आहे.